ती मी नव्हेच!!!!
नुकताच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा, जी सूत्रसंचालक, नर्तकी सुद्धा आहे ..असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या तरुण अशा कलाकार स्त्रीचा पहिला- वहिला कवितांसंग्रह प्रसिध्द झाला.
त्यातील कवितांचे वाचन करताना एका कवितेत ती स्वत:च म्हणते, "मी कवयित्री नाही."..........
ही स्वत:बद्दलची खात्री असतानासुद्धा काहीजणाचे लेखन मोठ्या
गाजावाज्यात प्रकाशित होते. त्यामागे त्यांचे समाज माध्यमातील प्रसिद्धी
वलय कारणीभूत असते. त्यांच्या प्रमाणेच अनेक लाखो लोकं असेच काही लिखाण किंवा कविता
करीत असतात... पण ते प्रकाशित होऊन त्याला प्रसिद्धी मिळतेच असे नाही.
वरील अभिनेत्रीचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे मी ही हे असे थातुर -मातुर
लिखाण करते. जे अतिशय तुटपुंजे आहे. त्याला तितकेसे साहित्यिक मूल्य नाही.
साहित्याच्या अथांग सागरातील माझे लिखाण म्हणजे एक य:कश्चित तुच्छ कण.........पण
काही माझे हितचिंतक मला प्रेमाने आग्रह करतात कि तुम्ही हे प्रकाशित करा.............
तेंव्हा मला त्या अभिनेत्रीप्रमाणेच म्हणावेसे वाटते..... ......मी ती
नाहीच......मी लेखिका नव्हेच......
पण तरीही......मी काहीतरी लिहित राहते..........पांढऱ्यावर काळे करीत
राहते.....हे साहित्य नाही ....खरेच ...पण त्या आहेत निखळ.... प्रामाणिक
भावना!!!!!!
मला नेहेमीच वास्तवाचेच, जे खरेखुरे आहे त्याचेच आकर्षण वाटत आले आहे.
सगळ्या जगात प्रसिद्ध असलेल्या हॅरी पॉटरचे किंवा सुपरमॅनचे मला किंचितही आकर्षण कधीच वाटले नाही. त्यांच्या लेखकांची प्रतिभा असामान्य आहे हे खरे...... ..त्यांना सलाम.!!!!...कधी कधी तर कल्पनेत भविष्यातील वास्तव दडलेले असते. सृजनशीलतेचा तो एक उत्तम आविष्कार असतो.......
पण तरीही........ काल्पनिक ...भासमान...सत्यात नसलेले मला कधीच भावले नाही...मला सत्य घटनेवरच्या ...वास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या कालाकृतीचेच अधिक आकर्षण वाटत आले आहे.
"सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे
जे सुदूर जे असाध्य तेथे मन धावे....."
बा. भ.
बोरकरसाहेबांना असाध्य गोष्टीची आस आहे.....असामान्य माणसाची असामान्य
प्रतिभा..........
माझ्या मनात असंख्य
विचार सातत्याने घिरट्या घालत असतात.......अगदी घोंगावत असतात ....भूत... अन वर्तमान.. ...........अनेक गोष्टींचे तरंग ...त्याची आवर्तने..... घटना-प्रसंग........ भावना आणि विचार ..... त्यांची बिंब- प्रतिबिंब .....
काही विचार
आणि भावना तर दीर्घ काळ कोंडून राहिलेल्या................माझे लिखाण हे त्यांचेच
outlet........
...... सर्व अगदी
खरे खरे...
त्यात
खोटेपणाचा, अप्रामाणिकपणाचा, किंवा काल्पनिकतेचा लवलेशही नाही............त्यात
कोणाला दुखवण्याचा किंचितही हेतू नाही.....कोणावर कुरघोडी करण्याचा प्रयत्नही नाही.......
त्या
लिखाणात मला लेखिका म्हणा असा अभिनिवेशही नाही........त्यात कोणतीही छुपी
महत्वाकांक्षासुद्धा नाही....स्वत;ला सिद्ध करून दाखवण्याची तडफड नाही........कोणावर दोषारोप नाही.......कोणताही blame-game नाही...
तरीही मी
लिहिणार...
कोणाला ते
आवडते,....कोणाला ते भावते....कोणाला त्यात आपले प्रतिबिंब दिसते ........कोणाला माझ्या नकळत ते दुखावते ...........कोणी नाकेही मुरडतात.........कोणी गैरसमज करून घेऊन संतापतात.........माझा तसा हेतू नसतानाही............कोणी माझ्या
लिखाणाच्या क्षुद्रतेची कीव करतात ....कोणी माझ्या लिहिण्याच्या धाडसावर हसतात.......
मी लेखिका
नाहीच........ तरीही............
या लिखाणाला
नाही प्रसिद्धीची आस.......
या लिखाणाला
नाही कौतुकाच्या वर्षावाची तहान.........
कोणी वाचले
तर आनंदच आहे.....
नाही वाचले
तरी राग नाही.............
मी आहे एक
संवेदनशील माणूस......कोठे ठेऊ मी माझे विचार? ...कोणाला सांगू या माझ्या भावना? .....कोठे आणि
कशा व्यक्त करू या संवेदना???.......काही खुपलेले......काही जाणवलेले ....काही
उमटलेले......काही जपलेले.....काही लपवलेले....कोठे ठेऊ??? ..........मग ते आपसूकच उतरते कागदावर ...........माझ्या जिवंतपणाचे ते लक्षण ...माझ्या जिवंत मनाचे ते द्योतक ......माझे लिखाण......
म्हणून मी लिहिते......मी ती नव्हेच.....मी लेखिका नव्हेच..... तरीही..............
खूप छान लेखन मॅडम.मनातील भावना अगदी योग्य शब्दात सहजपणे,प्रांजळपणे व्यक्त केल्यात.धन्यवाद! आम्ही आपल्या सहज लेखनाची वाट पाहू.
उत्तर द्याहटवाखूप छान मॅडम..... काही वेळेस मनातलं सांगावं वाटतं पण कुणाकडे सांगावं.... तशी ऐकून घेणारी माणसं पण नाहीत ना.... खूप छान मॅम 👍👍👍🙏🙏
उत्तर द्याहटवामस्त लेख असे वाटते तुम्ही प्रत्येकाच्या मनातले विचार मांडता खूप सहज लेखन वाटते पण लिहायला खूप अवघड आहे
उत्तर द्याहटवावास्तवात आपल्या समोर घडलेल्या, आपण अनुभवलेल्या घटना, जास्त आज पर्यंत पोहोचतात आणि सातत्याने आपल्या मनामध्ये रेंगाळणाऱ्या भावना निर्माण करतात. त्यामुळे केव्हा हे वास्तव अनुभवाच्या आधारावर लिहिलेलं लेखन जास्त समृद्ध, माणसाच्या समजून घेण्याच्या कक्षा रुंदावणार असतं, जे तुमचं आहेच. हे लेखन करून लेखणी बाजूला ठेवली की जाणवते आपण माणूस आहोत, म्हणून आपल्याला आजूबाजूच्या माणसांबरोबर आलेले अनुभव झालेल्या आंतरक्रिया जास्त स्पर्शुन जातात. आणि मनामध्ये त्यासंदर्भात थांबून राहिलेल्या भावना कागदावर किंवा कंप्यूटर/ मोबाईलच्या स्क्रीनवर रित्या झाल्याने, आणि साहित्य प्रसवातून जन्मलेल्या साहित्यकृती कडे पाहून जी कृतकृत्य तेची भावना अनुभवायला मिळते ती अतुलनीय असते.
उत्तर द्याहटवाखुप सुंदर आणि सहज शब्दात तुम्ही वक्त्य केलेल्या भावना.... अप्रतिम
उत्तर द्याहटवाखूप छान मॅडम...
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेख आहे मॅडम. आणखी पुढे काय? याची उत्सुकता आहेच. 👌👌💯👍👍
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर
उत्तर द्याहटवाMasta, manju , kharacha pratekyacha ayushat kahi goshiti astat, ki jya konala tari sangavyasha watat, ani koni sangayla nasel tar, at lease lihiun tari thevayla pahijet
उत्तर द्याहटवाकल्पना त्याज्य मानून वास्तव्याचे भान जपणारे, मुखवट्याविना चेहरे वाचणारे परिणामकारक, मनाला स्पर्श करणारे लेखन, खूप छान मॅडम आपणास खूप खूप शुभेच्छा व नमस्कार...
उत्तर द्याहटवा