कडेलोट
आता वाटते हा वादळ पाऊस कधी संपणारच नाही….
निसर्गाची लागलेली हाय वाटते कधी शमणारच नाही…..
पृथ्वीच्या गाभ्यात.. आत... खोल सगळच बिनसलं आहे
निसर्गाच्या आत्म्याचा तोल कुठेतरी खूप हलला आहे!
पूर्वी कसे नेमके असायचे
एकामागून एक ऋतु शिस्तीत यायचे.
निसर्गाच्या शहाणपणाला आपण किती धरावे गृहीत ?
प्रगतीच्या खोट्या नशेत किती राहावे धुंदीत ?
सहा ऋतूंचे अद्भुत सोहळे त्यांचा वेगळाच दिमाख!
त्यांच्या चांगुलपणा वर माणसाचा फुकटचा रुबाब !!
ते ऋतु, ते संणवार, आता काही तसे राहिलेच नाही
शरदात केशरी चांदणे, दिवाळीत गुलाबी थंडी आता असत नाही
काळ्या आईच्या सोशिकतेची कदर माणसा तू कधी केलीच नाही
निसर्गाच्या चांगुलपणाची किंमत करण्याची माणसा तुझी कुवतच नाही
घेतला वसा टाकून दिला.... माणुस पार मातून गेला...
सृष्टीच्या दुः खाचा कढ़ हमसुन हमसुन उतु गेला
वसुंधरा माझी आई , तिच्यात मी... आणि माझ्यात ती.....
मला कळते तिचे सोसणे, तिच्या सारखेच माझेही जगणे.
सहनशीलतेचा कडेलोट होऊन......
ऐन दिवाळीत कडकडून विजा तिचे दु:ख कोसळते .....
तिचे सोसणे तेंव्हा माझ्याही डोळ्यातून आपसूकच पाझरते.....
© नेहा देव
Ma'am though the English translation is not so cognizable but the gist seems nice
उत्तर द्याहटवाखूप सुंदर शब्दात निसर्गाच्या बदलांचे वर्णन केले
उत्तर द्याहटवाKhup sundar ahet bhav
उत्तर द्याहटवाअप्रतिम वर्णन मानव आणि निसर्गाचे 👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम , प्रांजळ व चिंतनात्मक मनोगत
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर आणि मार्मिक.मानवास आरसा दाखविणारा
उत्तर द्याहटवाVery accute
हटवाखूपच सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्द बांधणी मॅडम आणि शेवटची संकल्पना फारच भावते , "...तिच्यात मी .... माझ्यात ती ..."
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाखूप मार्मिक
वा मंजिरी खूप छान लिहिले आहेस खरेच असे वाटते आता खूप काहीतरी बिनसले आहे निसर्गाचे
उत्तर द्याहटवाVery well written ✨✨
उत्तर द्याहटवाखूप छान !मनाच्याही मनातले भाव समर्पक शब्दात
उत्तर द्याहटवाप्रतिबिंबित झालेत.
भौतिक सुख सुविधांच्या पाठीमागे धावून निसर्गाची अपरिमित लयलूट मानवाने केली. त्याचेच परिणाम - म्हणून ऋतूची अनियमितता दिसून येत आहे . आता पाऊस दिसत आहे. पुन्हा कडाक्याची थंडी पडेल अन् कधी काळी भयानक कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल . मॅडम छान वर्णन केले आहे. तसेच एक संवेदनशीत कवयित्री तुमच्यात दडलेली आहे. ती व्यक्त होत आहे.
उत्तर द्याहटवाNature is tonic of life.If we preserve nature ,nature will preserve us.
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवा