मनाच्याही मनातले
4) ऋणानुबंध
@नेहा देव
एका मे महिन्याच्या संध्याकाळी ती आमच्याकडे आली. माझ्या सक्त विरोधाला न जुमानता धाकटीने तिला आमच्याकडे हट्टाने आणलेच. धाकटी अशीच आहे. बेधडक, बेपर्वा. माझ्या अगदी विरुध्द! अर्थात तिच्या वडिलांचाही तिला छुपा पाठिंबा होताच.
माझ्या विरोधाला कारणही तितकेच सबळ होते. मुका बिचारा जीव! खाण्या पिण्यासाठी पूर्णपणे आपल्यावर अवलंबून राहातो. त्यामुळे सर्वाना एकदम घराबाहेर जाता येत नाही. कोणालातरी घरात अडकून पडावे लागते. घरात एका माणसाचे काम वाढते!!!!! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तरुणपणी आपल्याला खूप जीव लावणारे हे जीव एक दिवस जिव्हारीं खोल जखम करून निघून जातात. एकदा मी अनुभवले होते ते!!!!
मुलीने जरी जोरात सांगितले; मी करीन सगळे तिचे!.... तरी ते अजिबात विश्वासार्ह नाही आणि शेवटी सगळी जबाबदारी माझ्याच गळ्यात पडणार, ह्याची मला खात्री होती.
असो. मी अगदी थंडे स्वागत केले तिचे. दोन महिन्याची होती वाटते तेव्हा ती. धड गोंडस पिलू नाही अन पूर्ण वाढही झालेली नाही अशी. गाढवासारखे मोठे कांन अन चेहेऱ्यावर बावळट भाव!!!
सुरवातीला निग्रहाने तिच्याकडे दुर्लक्ष केले मी. पण घरापाठोपाठ माझ्याही नकळत माझ्या मनात घुसून तिने केव्हा आपले घर केले हे मलाही कळले नाही. तद्दन हिंदी फिल्मसारखेच! आधी विरोध आणि मग chemistry जुळते, नंतर आकंठ प्रेमचं प्रेम!!!
ती म्हणजे आमची ल्युसि!!! माझ्या ५३ वर्षाच्या आयुष्यातील हे दुसरे श्वान!
सहवासाने निर्जीव वस्तूमध्येही जीव गुंततो बायकांचा. हे तर हाडामासाचे जिवंत प्रकरण.
ल्युसि,लुस्मानिया, लुसमानखान,लुसोलिनी,लुसोबा(मसाबाच्या धर्तीवर) अशा फिरंगी नावांपासून ते लुशे-घुशे, घोडे ,ढोले,बावळे, गाढवे,नकटे अशा ग्राम्य भाषेतल्या कोणत्याही नावाने तिला पुकारायला तिची हरकत नसते. फारच चांगला मूड असेल तर मीनाक्षी ,राणी अशीही हाक मारली जाते. पण खरंतर माधुरी नाव तिला फारच खुलले असते. अशी सुबक ठेंगणी तरुण झाली आहे ती. डौलदार शरीर.काळी पाठ, पाठीवर रुळणारी ऐटबाज शेपूट.काळ्या बुबुळाभोवती मधाळ रंगाचे वर्तुळ. , पण....... गाढवासारखे कांन!!! हे एकच वैगुण्य!! .... मला भासणारे. आणिक एक म्हणजे I.Q जरा कमीच!!! आमचा चिनू फारच हुशार होता. हिच्यापेक्षा!!!
आमच्याकडे येताना आधीच्या कुटुंबातील नाव घेऊनच ती आली होती. त्यामुळे मराठी नाव ठेवण्याची माझी इच्छा फलद्रुप झाली नाही. (आमच्या आईकडच्या कुत्र्याचे नाव मी चिनु ठेवले होते आणि शेजारी आलेल्या पिलाला मी हरिप्रसाद म्हणत होते..... स्वदेशीचा पुरस्कार! )
ती घरात आली . सुरवातीचे कौतुकाचे दिवस गेले. ती घरात रुळली. तिला कोणतीही शिस्त लावायची ना कोणी तोशीस घेतली कि ट्रेन करण्यासाठी कोणी कष्ट घेतले .शेवटी आपले अधिकार आणि आपली कर्तव्ये तिची तिनेच ठरवून घेतली.घराच्या आजूबाजूला कोणीही आले तरी भुंकून आकांत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि मांजरासारख्या चिल्लर प्राण्याला भुंकून धाक दाखविणे हा आपला अधिकार आहे हे ठरवून ती कामाला लागली. कधी कोणी दारासमोर आले आणि आपल्याला बोलायचे असते तेंव्हा भुंकू नको म्हटले तर ती अजिबात ऐकत नाही.माझ्याकडे एक तीव्र कटाक्ष टाकून ती जणू म्हणते, " ए बाई माझे काम करू दे मला. हा माझा प्रांत आहे. तू नको ढवळाढवळ करुस." ..... मी मग माघार घेते.
अशीच एकदा पहाटे मी व्यायामासाठी बाहेर पडले, तर समोरून रस्त्यावरचे भटके कुत्रे आडवे गेले. ल्युसीचा पारा अस्मानात गेला. भुंकून भुंकून सगळी गल्ली दणाणून सोडली तिने. तेव्हापासून दररोज सकाळी न चुकता ती गेटपाशी थांबते. मी कोपऱ्यावरून वळून दिसेनाशी होईपर्यंत दक्ष राहून भुंकत राहते..... ....माझ्या बाईंना कोणीही त्रास दिलेला मला खपणार नाही असे जणू ती आपल्या भाईबंदांना बजावत राहते. तिचे हे संरक्षक कवच मला खूप सुखावते. असे protection केवळ आईकडूनच आपल्याला मिळत असते.
ल्युसि इतकी प्रेमळ आहे कि आम्ही काही खायला दिले तर आम्हाला स्वतःचा दात लागू नये म्हणून ती आटोकाट काळजी घेते, अलवारपणे ती वस्तू पकडण्याचा प्रयत्न करते
तिला मी कधीही मारलेले नाही, मारतही नाही (पार्श्व भागावर कधीतरी एक दोन चापट्या सोडून). पण मी नुसते "काठी!!!" असे म्हणताच ती कांन पाडून आपल्या गटांण्या डोळ्यात सखाराम गटणे पेक्षाही ओशाळवाणे भाव आणून ... .. माझे चुकलेच... असे सुचवत निघून जाते.
माझ्या धाकट्या मुलीची आणि नातीची ती खेळगडी आहे. त्यांच्याशी खेळताना गरीब गाईहूनही गरीबपणाने ती वागते. तेंव्हा वाटते गायीच्या ऐवजी चुकून कुत्र्याच्या जन्माला आली ती. आतापर्यंत कोणालाही ती कधीच चावलेली नाही. जणू आपल्या दातांचे दुसऱ्याला चावणे हे काम ती विसरूनच गेली आहे.

दिवसभर घरात, बागेत घुरु घुरु फिरल्या नंतर रात्री दहाच्या सुमारास मात्र मी "चला !!!!" असे म्हणताच इच्छा नसतानाही घर राखण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी ती धडपडत उठून बाहेर निघून जाते!!! मला भरून येते.!!!
असे कसे हे प्राणी असतात? काय त्यांची psychology असते? काय त्यांची mentality असते?केवळ दोन वेळचे पोट भरेल इतके अन्न , सहवास आणि थोडेसे प्रेम याव्यतिरिक्त चौथी काहीही मागणी नसते त्यांची. या अत्यल्प मागणीच्या मोबदल्यात ते त्यांचे आख्खे आयुष्य अक्षरश: आपल्या पायावर कुर्बान करतात.
कधीतरी कोण्या लेखकाचे एक वाक्य मी वहीत नोंदवून ठेवले होतें. ते आता माझ्या मनावर कोरले गेले आहे. पुन्हा पुन्हा मला ते appeal होत राहाते ,"The More I see Men ,The More I Like Dogs!".
इतका खरेपणा,इतकी नितळ प्रेम भावना, इतके ईमान, इतकी माया, इतकी एकनिष्ठता, इतके unconditional प्रेम माणसात आढळते? .... ....असेल पण अभावानेच ! बहिणाबाई उगीच नाही म्हणत.. "पाहुनिया माणसाचे व्यवहार खोटे नाटे ,तेव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे."
तिच्याशी जुळलेल्या या अनामिक भावबंधाच्या ऋणातून मी कधीच उतराई नाही होऊ शकत. तिची पण ती अपेक्षा नाहीच. आम्ही दोघीही अशाच एकमेकांशी बांधलेल्या!!! ऋणानुबंधाच्या घट्ट मारलेल्या गाठीने.
.......टेढी है पर मेरी है !!!!

Kharach mast lihita
उत्तर द्याहटवाखूप छान
हटवा